’12th फेल’ हा २०२३ मधील लोकप्रिय चित्रपट ठरला. आयपीएस मनोज शर्मा यांच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट आहे. अगदी कमी बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने खूप कमाई केली आणि प्रेक्षकांची मनंही जिंकली. यात विक्रांत मेस्सी आणि मेधा शंकर प्रमुख भूमिकेत होते. ६९ व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात ’12th फेल’ साठी विक्रांत मेस्सीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला. चित्रपटाच्या कथानकाने आणि दमदार कामगिरीने प्रेक्षकांना भुरळ घातली, तसेच अनेक कलाकारांनी या चित्रपटाचं खूप कौतुक केलं. आता भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा यानेही या चित्रपटाचं कौतुक केलंय. त्यावर नुकताच बाबा झालेल्या विक्रांत मेस्सीने रोहितच्या प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय कर्णधार रोहित शर्माला सिरीज किंवा चित्रपट पाहणाच्या सवयींबद्दल विचारलं असता रोहितने विक्रांत मेस्सी आणि मेधा शंकर अभिनित 12th फेल चित्रपटाचा उल्लेख केला आणि या चित्रपटाचे कौतुक केले. रोहित म्हणाला, “मी ’12th फेल’ हा चित्रपट पाहिला. तो चित्रपट खूप चांगला होता.” याव्यतिरिक्त, रोहितने विनोदी चित्रपट आणि खऱ्या घटनांवर आधारित चित्रपटांबद्दलची त्याची आवड सांगितली.
दरम्यान ‘12th फेल’ चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर हा चित्रपट आयपीएस अधिकारी मनोज शर्मा यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात विक्रांत मेस्सी, मेधा शंकर, अनंत व्ही जोशी, अंशुमान पुष्कर आणि प्रियांशू चॅटर्जी यांसारख्या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.