सुंदर दिसायला कोणाला नाही आवडत? आपल्या चेहऱ्यावर डाग, मुरमे, सुरकुत्या दिसू नयेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. विशेषत: महिला सुंदर दिसण्यासाठी त्वचेची खूप काळजी घेताना दिसतात. त्यासाठी त्या वॉटर रेजिस्टंट मॉइश्चरायजरचा वापर करण्याबरोबरच इतरही अनेक उपाय करून पाहतात. त्याशिवाय सण-समारंभ,पार्टीनिमित्त मेकअप प्रॉडक्ट्सचा वापर करतात. या मेकअप प्रॉडक्ट्समध्ये काजळ, आयलायनर, लिपस्टिक, मस्कारा अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. असे मेकअप प्रॉडक्ट्स अनेकदा सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारे असतात, असा दावा केला जातो. परंतु, त्यामुळे कर्करोग, हाय कोलेस्ट्रॉल, थायरॉइड रोग, यकृत खराब होणे, दमा व अॅलर्जी यांसारख्या आजारांचा धोका वाढत असल्याचे समोर आले आहे. कारण- या मेकअप प्रॉडक्ट्समध्ये परफ्लुओरोआल्किल पदार्थ (PFAS) नावाच्या मानवनिर्मित रसायनाचा अधिक वापर केला जातो; जे आपल्या शरीरासाठी घातक ठरत आहे. याच विषयावर द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना कन्सल्टंट डर्मेटोलॉजिस्ट व एस्थॅटिक डर्मेटोलॉजिस्ट डी अग्रवाल, डॉ. कश्यप यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
मेकअप प्रॉडक्ट्समुळे वाढत्या आजारांचा धोका पाहता, न्यूझीलंड २०२६ च्या सुरुवातीला कॉस्मेटिक उत्पादनांवर बंदी घालणारा पहिला देश बनण्याच्या तयारीत आहे.